माझी पुस्तके

'प्रेस डिक्शनरी' नावाचा ‘इंग्रजी-मराठी' शब्दकोश प्रसिद्ध. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाने हा कोश प्रसिद्ध केला आहे. पत्रकारितेत उपयुक्त असलेल्या ५ हजार इंग्रजी शब्दांचा त्यात समावेश आहे. लोकमतचे समूह संपादक श्री. दिनकर रायकर यांची प्रस्तावना असलेल्या या ग्रंथाची प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सुधीर गव्हाणे यांनी पाठराखण केली आहे. वृत्तसंस्थांच्या इंग्रजी बातम्यांचे सलग १० वर्षे अध्ययन करून हा कोष तयार करण्यात आला आहे.